उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता - पंजाबराव डख
28-08-2024
उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता - पंजाबराव डख
उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला. तसेच नाशिक,गुजरात येथे दि.30 ऑगस्ट पर्यन्त चांगला पाऊस पडणार आहे. त्याबरोबर काही भागांमध्ये या तीन दिवसांमध्ये उघड आहे.
राज्यामध्ये दि.27 पासून ते 30 ऑगस्ट पर्यन्त उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मालेगाव या भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तसेच काही भागांमध्ये 31 ते 2 या तीन दिवस उघड पडणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबर पासून पुन्हा जोरदार पाऊस आहे.
विदर्भातील शेतकाऱ्यांनी या तीन दिवसामध्ये शेतीकामे करून घ्यावी असे पंजाबराव डंख यांनी सांगितले. कारण पश्चिम विदर्भ व मराठवाड्यामध्ये दि.1 ते 6 सप्टेंबर पर्यन्त जोराचा पाऊस पडणार आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, यवतमाळ, आदिलाबाद, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, अचलपूर, बुलढाणा, जळगाव, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, गंगापूर या दिशेने येणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रमध्ये सरींचा पाऊस पडणार आहे.
कोकण आणि मुंबईतील पाऊस कायम चालू राहणार आहे. त्यामुळे 5 सप्टेंबर पर्यन्त जायकवाडी धरण 78 टक्के भरणार आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरते.