महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कोकण व विदर्भात रेड अलर्ट...

19-07-2024

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कोकण व विदर्भात रेड अलर्ट...

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, कोकण व विदर्भात रेड अलर्ट...

राज्यात मागील दोन आठवड्यापासून चांगला पाऊस पडत असून जून महिन्याच्या मध्यानंतर पावसाची सरासरी थोडी कमी झाली होती. त्यानंतर आता पावसाचा जोर वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. कोकण घाटमाथ्यावर व विदर्भातील पूर्व भागात चांगला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर, आज (दि. १९) रोजी राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा सोडून राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात सुद्धा छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. पण उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्हे सोडून सर्व दूर चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे.

मुसळधार पाऊस, रेड अलर्ट, कोकण पाऊस, विदर्भ पाऊस, हवामान अलर्ट, पावसाची शक्यता, जोरदार पाऊस, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट, महाराष्ट्र पाऊस, paus, rain, पाऊस, रेन

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading