Heavy rain : राज्यात दोन दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस
12-09-2023
Heavy rain : राज्यात दोन दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस
- राज्यात १४ ते १९ सप्टेंबरमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
- सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही.
- त्यामुळे अजूनही राज्यात जोरदार पावसाची आशा शेतकऱ्यांना आहे.
- पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.
- तसंच राज्यात १३ तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे.
- मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे.
- दरम्यान, बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची राहिली.
- जिल्ह्यातील १४ मंडळात १० ते १८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.
- लातूर जिल्ह्यात सर्व ६० मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला.
अशाप्रकारे हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी https://wa.link/e3bzf0 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.
source : krishijagran