राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज
30-04-2024
राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रही उबदार राहण्याची अपेक्षा आहे.
- राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.
- ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातही आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा ईशारा दिला.
- मराठवाडा जिल्ह्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रात्रीची उष्णताही जास्त राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केल.
- भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे.
- पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.