मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
24-04-2024
मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. २४) भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 24 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कर्नाटक आणि लगतच्या भागात सरासरी समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. २३) वाशिममध्ये सकाळपर्यंत 24 तासांत 42.2 अंश सेल्सिअस इतके राज्यातील सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) मुंबई आणि कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान अपेक्षित आहे, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन आणि उकाडा राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३९, नगर ३९.८, धुळे ४१, जळगाव ३६.७, महाबळेश्वर ३१.५, मालेगाव ३९.६, नाशिक ३५.९, निफाड ३५.९, सांगली ३७.६, सातारा ३८.६, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३४, रत्नागिरी ३४, छत्रपती संभाजीनगर ३८.२, नांदेड ४०.२, परभणी ४०.७, अकोला ३६.९, अमरावती ३३, बुलडाणा ३८, ब्रह्मपुरी ३७.८, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ४०, गोंदिया २६.८, नागपूर ३३, वर्धा ३५.५, वाशीम ४२.२, यवतमाळ ३८.५.
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
वाशीम ४२.२, धुळे ४१, परभणी ४०.७, सोलापूर ४०.२, नांदेड ४०.२, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ४०.