आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय काय मिळालं?
23-07-2024
आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय काय मिळालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांना होती. आज (ता. 23) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
सर्वप्रथम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जनतेचे आभार मानले. गरीब, महिला, युवा व शेतकरी या चार स्तंभांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. व या अर्थसंकल्पामध्ये आपण तेच घडून आणले असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. उदा. शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा इत्यादिंचा समावेश असून मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकर्यांकरिता मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा:
- नैसर्गिक शेती करण्यावर भर देणार.
- कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारकडून विशेष भर.
- डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याला प्राधान्य.
- शेतकर्यांकरिता डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकर्यांचा रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने होणार.
- शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल त्यातून शेतीपिकांचं सर्वेक्षण, मातीची तपासणी या सर्व गोष्टींची माहिती शेतकर्यांना दिली जाईल.
- यंदा शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद राबवण्यात आली आहे.
- सोयाबीन व सुर्यफुल बियांचा साठा वाढवणार.
- 32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित करणार.