अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार? काय आहे हवामान अभ्यासकांचा अंदाज?

14-05-2024

अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार? काय आहे हवामान अभ्यासकांचा अंदाज?

अवकाळी पाऊस अजून किती दिवस राहणार? काय आहे हवामान अभ्यासकांचा अंदाज?

अवकाळी पावसाचा जोर आणखी किती दिवस राहणार आहे? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (ManikRao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील वातावरणात मोठा बदल (Climate change) झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावलीय. विशेष मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane)परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. या पावसामुळं काही भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून, काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, हा अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? असा सवाल उपस्थित केलाजात आहे. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (ManikRao Khule) यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण अजूनही कायम

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती 19 मे पर्यंत कायम राहील. 19 मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

आज पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात सुद्धा मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे हा पाऊस ऊस पिकासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फळबागांसह भाजीपाला पिकांना फटका बसलाय. दरम्यान, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

unseasonal rain, rain in maharashtra, rain in may, monsoon rain, unseasonal

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading