शासनाच्या आर्थिक सहाय्यासाठी ई-केवायसी कशी करावी..?
08-10-2024
शासनाच्या आर्थिक सहाय्यासाठी ई-केवायसी कशी करावी..?
कुठलीही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.
आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजने मार्फत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
पहिल्या वेळी लॉगिन करतानाच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करावी..?
- https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.\
- 'Disbursement Status' (वितरण स्थिती) या टॅबवर क्लिक करा.
- Enter Aadhaar Number' या रकान्यात आपल्या आधार क्रमांकाची नोंद करा.
- captcha रकान्यात दिलेल्या सांकेतिक अंक-अक्षरांची नोंद करा. वापरकर्त्याला पुढील पृष्ठ दिसू लागेल. त्या पृष्ठावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय दिसतील.
ओटीपी आधारित ई-केवायसी:
- 'OTP' या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या आधार-संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
- ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ओटीपीची नोंद करा.
- 'Get Data' या बटणावर क्लिक करा.
- तुम्ही नोंद केलेला ओटीपी, मोबाईलवर प्राप्त ओटीपीसोबत जुळल्यास ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.
बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी:
- 'Biometric' या बटणावर क्लिक करा.
- वापरकर्त्याने यंत्रणेमध्ये स्थापित केलेल्या उपलब्ध उपकरणांमधून योग्य पर्यायाची निवड करा.
- योग्य उपकरणाची निवड केल्यास ड्रायव्हर काम करू लागेल.
- Biometric उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल.
- वापरकर्त्याने या प्रकाशित भागावर आपले बोट ठेवून दाबावे.
- बायोमेट्रिकची नोंद घेतली जाईल आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज पटलावर दिसू लागेल.
- Validate UID वर क्लिक करा.
- ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.