पोल्ट्री व्यवसायासाठी आदर्श शेड बांधणी मार्गदर्शन...
19-11-2024
पोल्ट्री व्यवसायासाठी आदर्श शेड बांधणी मार्गदर्शन...
पोल्ट्री किंवा कुक्कुटपालन हा एक सक्षम शेतीपूरक व्यवसाय असून या माध्यमातून आपण लाखो रूपयांची कमाई करू शकतो. सध्या अनेक तरूण पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत. पण पोल्ट्री व्यवसाय सुरू करताना सर्वांत आधी मुलभूत गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
यामध्ये पोल्ट्री शेड बांधणीपासून मार्केटिंगपर्यंतच्या सर्वच गोष्टींचा सामावेश होतो. पोल्ट्री व्यवसाय सुरू करत असताना सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे पोल्ट्री शेडचे बांधकाम.
शेड बांधताना आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक असते. त्यामध्ये आपली जागा, आपल्या मातीचा प्रकार, आपण शेडसाठी वापरत असलेले मटेरियल, आपले भांडवल आणि आपल्या शेडची लांबी रूंदी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.
शेड कसे असावे..?
- आपण जर बॉयलर किंवा गावरान कोंबडीपालनाचा विचार करत असू तर एका कोंबडीसाठी १.२ ते १.५ चौरसफूट जागा लागते.
- आपल्या शेडचे बांधकाम पूर्व-पश्चिम असे असायला हवे शेडमध्ये थेट सूर्यप्रकाश येऊ नये यासाठी असावे.
- १ हजार पक्षासाठी १ हजार २०० ते १ हजार ५०० चौरस फुटाचे शेड लागेल
- शेडची रूंदी २२ ते २८ फूट असावी आणि लांबी आपल्याला हवी तेवढी घेता येते.
- कमी रूंदीच्या शेडमध्ये हवा आल्यानंतर लगेच निघून जाईल.
- शेडच्या ठिकाणी लाईट आणि पाणी असणे आवश्यक असते.
- शेडमध्ये वा खेळती राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे
- सिमेंटचे पत्रे वापरले तर कमी खर्चात चांगले शेड तयार होईल
पोल्ट्री व्यवसायाकरिता शेड बांधणीला वरील गोष्टींचा आवश्यकता असते. दिवसेंदिवस शेड बांधणीमध्येही नवे तंत्रज्ञान येत असल्यामुळे आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. सध्या शेतकरी ईसी पोल्ट्री फार्म तयार करण्याकडे जास्त भर देत आहेत. या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.