Drought : एक महिना उलटून देखील दुष्काळग्रस्त मंडळांत उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच

15-12-2023

Drought : एक महिना उलटून देखील दुष्काळग्रस्त मंडळांत उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच

Drought : एक महिना उलटून देखील दुष्काळग्रस्त मंडळांत उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच

Drought Condition : एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.

शासनाने यंदा सुरवातीला ४० तालुक्यात व नंतर १०२१ महसुल मंडलांत दुष्काळ जाहीर केला. या मंडलांत दुष्काळीस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे जाहीर केले.

मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शासन आणि प्रशासनात याबाबत समन्वयाचा अभाव आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत.

पुरेसा पाऊस नाही, खरिपाची पिके गेली, रब्बीत तर अनेक गावांत पेरणीच झाली नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शासनाने राज्यात ३१ आक्टोबरला १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांत तीव्र तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे.

त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी नव्याने अध्यादेश काढून २७ जिल्ह्यांतील २०२१ मंडले दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केली. दुष्काळ आणि दुष्काळसदृष्ट असे असले तरी दोन्ही गावांत आठ प्रकारच्या सवलती मिळणार असल्याचे आणि त्या तातडीने लागू करणार असल्याचे जाहीर केले. मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झालेली नाही

अनेक गावांत दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबविणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट व वीज न तोडणे या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. कर्जवसुली, विजेची तोडणी सुरुच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जाहीर झालेल्या सवलती…

  • जमीन महसुलात सूट,
  • पीक कर्जाचे पुनर्गठन,
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगित
  • कृषिपंपांच्या चालु बिलात ३३.५ टक्के सूट
  • शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी
  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर
  • शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

कोरडगावकडे दुर्लक्ष कायम

कोणत्याही धरणाचे पाणी शाश्वत नाही. बहुतांश भाग कोरडवाहू. यंदा तर पाऊसही कमी. त्यामुळे खरिपातील बहुतांश पिके वाया गेली. रब्बीत अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पेरणी करता आली नाही. यापुढचे जुलैपर्यंतचे आठ महिने कसे काढायचे, याची चिंता आहे. असे असूनही नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील कोरडगाव (ता. पाथर्डी) मंडळाला दुष्काळातून वगळले. शासनाकडून अन्याय होत असल्याची भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

source : agrowon

drought affected circles, implementation schemes

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading