राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या महत्त्वाच्या घोषणा
09-03-2023
राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या महत्त्वाच्या घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार वाढवण्यात येणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडल्याचं दिसून येतंय. कृषी क्षेत्रासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, महाकृषीविकास अभियान, एक रुपयात पीक विमा योजना आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 6000 रुपये देणार असल्याची घोषणा केली.
कृषी खात्यासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषीविकास अभियान
- राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
- मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
- आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
- या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
विदर्भ आणि मराठवाड्यात केसरी शिधा धारकाना आता रोख रुपये दिले जातील. प्रतिव्यकती 1800 रुपये दिले जातील
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!
- 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार. त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळणार
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
source : abplive