भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

01-07-2024

भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

सध्या भाजीपाल्यांच्या दरात वाढ होत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण त्यांना आर्थिक फायदा होत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या दर वाढीचा फटका बसत आहे.

भाज्यांच्या दरात का होतेय वाढ?

सध्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. याचा परणाम भाजीपाल्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं भाज्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एक-दोन आठवड्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. तापमानवाढीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय. अशा स्थितीत भाजीपाला बाजारात पोहोचू शकत नसल्याने भाजीपाल्यांची आवकही कमी होत आहे. 

एवढेच नाही तर तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे बाजारात ठेवलेला भाजीपाला लवकर खराब होत आहे. सध्या बटाटे, टोमॅटो,  कांदा यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, उन्हाळ्यात सर्वत्र भाज्यांचा तुटवडा असतो. मात्र, यंदा पावसाळा सुरु झाला तरी भाज्यांची टंचाई पाहायला मिळत आहे. यावेळी काही भागात मान्सूनचा पाऊसही उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळं देखील पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या हंगामातील पावसात 18 टक्के तूट असल्याचं पाहायला मिळत आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास भाज्यांचे दर कमी होतील:

माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, उष्मा व कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झालेला आहे. तज्ज्ञांच्या मते, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दर कमी होऊ शकतात. सध्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायमच आहे.  

टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ:

सध्या टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ ही दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळं व मान्सूनचे उशिरा आगमन यामुळं भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. कडक उन्हामुळं भाजीपाला खराब होऊ लागला आहे. त्यामुळं भावात वाढ होत असल्याने आहे. मात्र येत्या आठवडा भरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर हे कमी होण्याची शक्यता आहे.

भाज्यांचे भाव वाढ, भाजीपाल्यांच्या दरात वाढ, शेतकरी आर्थिक फायदा, Vegetable prices, Farmers' benefit, Price impact, Rising prices, Heatwave effects, Supply drop, Vegetable spoilage, bhavwadh, भाववाढ

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading