कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
07-10-2023
कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
कृषी क्षेत्राच्या विकासात एकाच वेळी अनेक उद्योग आणि व्यवसायांसाठी संधी आहे, ज्यामुळे शेतकरी बंधूंना मोठा नफा देणारा व्यवसाय उभारू शकतो. कारण आपल्याला माहित आहेच की शेतामध्ये पिकणाऱ्या भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण्याची सुविधा असणे खूप गरजेचे असल्याने कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळेच कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या लेखात या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.
कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय
जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात असणाऱ्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून घेणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही राहत असलेल्या दहा ते पंधरा किलोमीटर पट्ट्यात कुठल्या प्रकारच्या फळांची व भाजीपाल्याचे उत्पादन होते, तसेच दुग्ध व्यवसाय किती प्रमाणात आहे, किंवा एखाद्या मत्स्य किंवा चिकन किंवा मटण मार्केट इत्यादी गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासणे गरजेचे आहे.
तसे पाहायला गेले तर कोल्ड स्टोरेजचा प्रामुख्याने उपयोग हा भाजीपाला व फळे तसेच इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने साठवता याव्यात व त्यात बऱ्याच दिवसापर्यंत टिकाव्यात यासाठी होतो. बऱ्याचदा एखाद्या शेतमालाचे एकाच वेळी जास्त उत्पादन निघते व बाजारपेठेत भाव पडतात. परंतु कोल्ड स्टोरेज असेल तर यामध्ये वस्तू साठवून ती टिकवून ठेवणे सोपे जाते त्यामुळे कोल्ड स्टोरेज हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.