गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण
06-09-2022
गाजर गवत तणांचे एकात्मिक नियत्रंण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात गाजर गवत (Carrot grass) हे पाढंरीफुली, चटकचांदणी, ओसाडी व कॉग्रेस गवत अशा अनेक नावाने ओळखले जाते. गाजर गवत हे एक परदेशी तण असुन याला शास्त्रीय भाषेत पार्थे नियम हिस्टोरियो फोरस असे म्हणतात. गाजर गवताचे मुळ स्थान अमेरिकेतील मेस्किको असुन जागातील इतर देशात ह्या तनाचा प्रसार मेक्सिकोपासुन झालेला आहे.
गाजर गवताच्या एका झाडाला साधारणंत 1000 पर्यंत फूले येऊ शकतात व एका झाडापासुन 10 ते 15 हजार बिया निर्माण होऊ शकतात. इतके सर्व बी सुमारे अडीच ते तीन एकर जमीन व्यापुन टाकु शकते बी काळसर लंब वर्तुळकार, लहान आणि वजनाने हलके असुन बियात दोन अनुबंध असतात त्यामुळे ते वाऱ्याने सहज उडुन जाऊन तणाचा प्रसार होतो.
गाजर गवत तणांचा प्रसार (Propagation of carrot grass weeds):
सदर गवताचे प्रादुर्भाव व प्रसार हा शेतीमधील बांध व शेताच्या बाजुचे बांध, पडीक जमीन, चराऊ कुरणे, औद्योगिक वसाहती, महामार्ग, रेल्वे मार्ग, महामार्गाच्या दुतर्फा, नदी-नाले, तलाव, डबके इ. ठिकाणी हे तण मोठ्या प्रमाणात आढळुन येते. तसेच शेतातील जवळपास सर्वच पिकांमध्ये उदा. तुर, कापुस, ज्वारी, भुईमुग, ऊस, भाजीपाला व फळ पिके मध्ये सुध्दा आढळुन येते.
गाजर गवतामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम (Health effects of carrot grass):
गाजर गवताच्या फुलामंधील परागकंणामुळे माणसांना विविध प्रकारची ॲलर्जी होते. उदा. सर्दी,शिंका,अंग खाजणे,दमा,श्र्वसणाचा त्रास, त्वाचा विकार इ. वनस्पतीत आढळणाऱ्या पार्थेनीन या ग्लुकोसाईड शिवाय काही ॲक्लोईडस सुध्दा आढळतात. त्यामुळे त्याला कडवट चव व न आवडणारा वास येतो. त्यामुळे जनावरे हे गवत खात नाहीत.
या तणाशी माणसाचा संपर्क आला तर त्वचा रोग, एक्झीमा व अस्थमा या सारखे विकार होतात. शेतातील पिकाबरोबर अन्नासांठी स्पर्धा केल्यामुळे उत्पादनात घट आणि पडीक जमिनीतील जनावरांच्या चराई क्षेत्रात घट येते. परागकणांमुळे तेलबिया, भाजीपाला व फळे इ. पिकांच्या उत्पादनात घट होते. तसेच मुळाद्वारे जमिनीत विषारी रसायने सोडल्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होते या गवतामुळे होणारे नुकसान विचारात घेता पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येईल.
- प्रतिबंधात्मक (Restrictive): शेतातील गाजरगवत फुलावर येण्यापुर्वी मुळासकट उपटुन काढावे. कंपोस्ट खड्डे, ओलीताचे दांड, शेतातील बांध, शेताच्या कडेचे बांध, रेल्वे लाईन्स, रस्ते पडीक जमीनी इ. ठिकाणचे गाजरगवत संपुर्णत मुळासकट उपटुन टाकणे व त्याचा ढिग करुन वाळल्यानंतर जाळणे यामुळे पहिल्या पावसात उगवुन आलेले गाजर गवताचे उच्चाटन होईल. पावसाळा संपल्यावर वाळलेले गाजर गवत दक्षता घेऊन जाळुन टाकणे.
- निवारणात्मक (Preventive): उभ्या पिकांतील गाजर गवत निंदणी, खुरपणी, कोळपणीद्वारे मुळासकट काढावे. पडीक जमिनीत म्हणजेच कोणतेही पिक, फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट (41% एस.एल) 8 ते 10 मि.ली. किंवा 2,4-डी (58%) 2 ते 3 मि.ली. प्रतिलिटर याप्रमाणे तणनाशकाची शिफारस आहे. तथपी 2,4डी चा वापर करताना परिसरात व्दिदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- पीक उभे असताना तणनाशकाचा वापर करणे टाळावे. उगवणपुर्व तणनाशकांचा वापर करण्यापुर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. पीक व तण उगवणीपुर्वी ॲट्राझीन5 कि. प्रति हे.500 ते 600 लिटर पाणी वापरुन फवारणी करावी. वरील तणनाशके उपलब्ध नसल्यास 10% मिठाचे द्रावण तयार करुन ज्या ठिकाणी दाट गाजरगवत आहे त्या ठिकाणी फवारणी करावी.
- नैसर्गिक नियत्रंण (Natural control) : विविध लागवडीपध्दतीप्रमाणे विविध पिकांची फेरबदल करुनही गाजरगवताची समस्या कमी करता येऊ शकते उदा. ज्वारी,झेंडु, धैंचा, बरसीम आदीमुळे प्रसार कमी होतो त्याची वाढ खुंडते.
- यांत्रिक पदध्तीने गाजर गवत नियत्रंण (Mechanical control of carrot grass): यंत्राच्या साह्याने किंवा विळयाने गाजरगवत मुळासकट काढावे व त्यांची विल्हेवाट लावावी. योग्यप्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा उगवु शकते यासाठी पावसाळा हा चांगला काळ आहे. हाताने गाजरगवत उपटताना हातमोज्याचा वापर करावा.
- निर्मुलनात्मक उपाय योजना (Elimination plan) : गाजरगवत हे सर्वच ठिकाणी वाढत असल्यामुळे संघटीतरित्या शेतकरी, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ यांच्या साह्याने ग्रामीण भागात जागरुकता निर्माण करणे त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे व कार्यक्रम यांचा उपयोग होईल. गाजर गवताकडे सामाजिक दक्षतेचा विषय म्हणुन पाहुन त्यानुसार नियोजन करावे. म्हणुन एकाचवेळी सामुहिक रित्या गाजरगवत फुलावर येण्यापुर्वी नष्ट केल्यास गाजरगवत वाढीस आळा बसु शकेल म्हणुन या तणाच्या नियत्रंणासाठी दरवर्षी 16 ते 22 ऑगस्ट या सप्ताहात संपुर्ण भारतात गाजरगवत जनजागृती मोहिम राबविली जाते.
- जैविक नियत्रंण (Biological control): गाजरगवताचे जैविक नियत्रंणासाठी प्रकल्प संचालक, जैविक नियत्रंण बेंगलोर यांनी संशोधित केलेल्या, (झायगोग्रामा बायोकोलोराटा) या मेक्सीकन भुंग्याची गाजरगवत नियत्रंण नियत्रंणासाठी शिफारस केलेली आहे.
- सदरचे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडल्यास हे स्थिर होऊन गाजरगवताचे प्रभावी नियत्रंण करतात.
गाजर गवत जागरुकता सप्ताह विशेष लेख 16 ते 22 ऑगस्ट 2021
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या)
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगांव
ता. वैजापुर, जि. औरंगाबाद
मो. 7888297859