खुरासणी (कारळा) पीक उत्पादनाची पद्धत आणि बिजप्रक्रिया...

22-10-2024

खुरासणी (कारळा) पीक उत्पादनाची पद्धत आणि बिजप्रक्रिया...

खुरासणी (कारळा) पीक उत्पादनाची पद्धत आणि बिजप्रक्रिया...

सुंदर पिवळी फुले असणारे खुरासणी हे आपत्कालिन परिस्थितीमध्ये तग धरणारे एक महत्वाचे तेलबिया पीक असून महाराष्ट्रात या पिकाला कारळा असेही संबोधले जाते. या पिकाच्या बियांमध्ये ३५ ते ४०% तेलाचे तर १८ ते २०% प्रोटीनचे प्रमाण आढळते.

बियांपासून मिळणारे तेल आरोग्यवर्धक, पौष्टिक, औषधी असून त्या पासून मिळणाऱ्या तेलाला डोंगराळ भागातील लोकांचे तूप म्हटले तरी देखील वावगे ठरणार नाही. 

हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्यामुळे या भागामधील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात त्याबरोबर जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात.

सुधारित वाण:

  • फुले कारळा (आय. जी. पी. एन. २००४-१) खोडाचा रंग अति जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानचा रंग अति हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९-४०% 4
  • फुले वैतरणा (आय. जी. पी. एन. ८००४) खोडाचा रंग जांभळा, फुलाचा रंग नारंगी, पानचा रंग हिरवा आणि तेलाचे प्रमाण ३९-४०%

बिजप्रकिया:

पेरणीपूर्वी कार्बेन्डॅझिम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅ./कि. अशा प्रमाणामध्ये किंवा थायरम ३.० ग्रॅम प्रति किलो बियाणे बियाण्यास चोळावे. अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम हे जीवाणूसंवर्धक २५ ग्रॅ. प्रति कि. बियाणास चोळावे व त्यानंतर २५ ग्रॅ. स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रति किलो बियाण्यास चोळावे.

काय आहे बियाणे मात्रा आणि पेरणी पध्दत..?

  • हेक्टरी ४-५ किलो बियाणे पुरेसे असते. शेतकरी खुरासणीची पेरणी बी फोकुन करतात. पण अधिक उत्पादनासाठी ३० x १० सें.मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी.
  • पेरणी करताना खुरासणीचे बी वाळू, बारीक मऊ शेणखत अथवा राखेमध्ये (१:२०) मिसळून २ ते ३ सें. मी. खोलीवर पेरावे.
  • पेरणी झाल्यानंतर ते त्वरित मातीने झाकून घ्यावे.
  • पेरणी करताना दोन ओळींमध्ये आणि दोन रोपांमध्ये अंतर ठेवल्यास रोपांची चांगली वाढ होते.
  • योग्य अंतरावर खुरासणी पिकाची पेरणी, निंदनी आणि खते दिल्याने रोपांची व फांद्यांची उत्तम वाढ होण्यास मदत होते.
  • त्यामुळे अधिक उत्पादनासाठी ३० x १० सें. मी. अंतरावर ओळीने पेरणी करावी आणि शिफारशीप्रमाणे आंतरमशागत करावी व खते द्यावीत.

खुरासणी पीक, कारळा पीक, तेलबिया, खुरासणी तेल, बियाणे प्रक्रिया, पेरणी पध्दत, खुरासणी पेरणी, खुरासणी खते, खुरासणी उत्पादन, तेल, shetkari, karala, perni, tel, oil, khurasani, bijprakriya, Khorasani

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading