कुसुम सोलार लाभार्थ्यांनसाठी शेवटची संधी ...!
20-09-2023
kusum solar yojana : कुसुम सोलार लाभार्थ्यांनसाठी शेवटची संधी ...!
sour urja : सौर ऊर्जाद्वारे दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्थात पीएम कुसुम ही योजना राबवली जात आहे. राज्यांमध्ये महाऊर्जेच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. जवळजवळ आतापर्यंत राज्यातील 75 हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलर पंप (solar pump) देण्यात आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचे इंस्टॉलेशनची (solar pump installation) प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच्यानंतर जे शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होते अशा शेतकऱ्यांची पात्र करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे, आणि याच्याच अंतर्गत काही शेतकऱ्यांनी जे अर्ज केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी जी कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आलेली आहे, अशा त्रुटी आढळून आलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कागदपत्राची पूर्तता करावी अशा प्रकारचा आव्हान महाऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज द्वारे करण्यात आलेला आहे.
मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी ( solar registration ) करण्यात आलेली आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज पूर्ण केलेले आहेत कागदपत्र अपलोड केलेले आहेत पण ते कागदपत्र अपलोड करताना बऱ्याच वेळा बँकेचा पासपोर्ट अस्पष्ट स्वरूपामध्ये अपलोड होणार सातबारा चुकीचा अपलोड होणार किंवा सातबारा जो अपलोड केलेला आहे. त्याच्यावरती सिंचनाच्या साधनांची नोंद नसणं अशा प्रकारच्या बऱ्याच सार्या त्रुटी आढळून येतात काही शेतकऱ्यांच्या सिंचनाच जे साधन असेल ते सामायिक स्वरूपामध्ये असतं किंवा काही शेतकऱ्यांनी जो सातबारा अपलोड केलेला आहे, त्या सातबारावरील जमीन सामायिक स्वरूपामध्ये असते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना सामायिक जमीन जर असेल तर NOC कागदपत्र अर्थात शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरती इतर सहमती धारकाचे एक जी सहमती असते ती सहमती देखील अपलोड करावी लागते.
हे हि वाचा : मराठवाड्यासाठी तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपये खर्चाचा संकल्प, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला
अशा प्रकारचे बरेचसे कागदपत्र लाभार्थ्याच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेले नसतात किंवा केलेले कागदपत्र स्पष्ट स्वरूपामध्ये असतात आणि अशाच या छाननीच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची कागदपत्र अपूर्ण स्वरूपामध्ये आढळतात, अशा लाभार्थ्याला महाऊर्जेच्या माध्यमातून कळविण्यात येत ते कागदपत्र दोन दिवसाच्या आत मध्ये अपलोड करून आपला अर्ज पूर्ण करावा अशा प्रकारचे त्यांना एसएमएस द्वारे आव्हान केले जातात परंतु यापुढे सुद्धा आपण पाहिले होते की ज्यावेळेस पासून एसएमएस यायला सुरू झाले होते त्यावेळेस पासून लाभार्थ्याला पीएम कुसुमच्या पोर्टल वरती आपले कागदपत्र अपलोड करण्यासाठी लॉगिन करता येत नव्हतं त्याच्यावरती काही तांत्रिक कारणामुळे लाभार्थ्यांना आपले कागदपत्र अपलोड करता येत नव्हते याच्यासाठी आपण यापुढे सुद्धा आव्हान केले होते की महाऊर्जाचा जो मेडा कार्यालयाचा आपला जो जवळचा नंबर असेल किंवा जवळचा जो काही मेल आयडी असेल त्याच्यावरती मेल करून हे कागदपत्र द्यायचे होते आणि आता याच्यासाठी मेडाच्या माध्यमातून महाऊर्जाच्या माध्यमातून या त्रुटी आढळून आलेल्या शेतकऱ्यांना आपले कागदपत्र पूर्ण करण्याचं अपलोड करण्याचा किंवा मिळाला पाठवण्याचा आवाहन करण्यात आलेले आणि याच्यासाठी शेवटची तारीख ही 24 सप्टेंबर 2023 देण्यात आलेल्या अर्थात या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे 40 ते 50 टक्के पर्यंत लाभार्थी हे त्रुटीमध्ये आढळून येतात आणि अशा त्रुटीमध्ये आढळून आलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर म्हणजे 24 सप्टेंबर 2023 पूर्वी आपले कागदपत्र अपलोड करावेत आपले कागदपत्र मिळण्याकडे पाठवावेत अशा प्रकारचा आव्हान करण्यात आलेल आहे.
जर या कालावधीमध्ये जर कागदपत्र पूर्णतः केली नाही किंवा कागदपत्र जर या कालावधीमध्ये अपलोड केले नाही तर त्या लाभार्थ्याला योजनेच्या अंतर्गत अपात्र केलं जाणार आहे, त्याच्यामुळे योजनेच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. आपली जी कागदपत्र अस्पष्ट असतील ते कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही मेढा कार्यालयाला जर मेलद्वारे जर आपले कागदपत्र पाठवत असाल तर योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र परत एक वेळेस स्कॅन करून व्यवस्थित असे सुस्पष्ट असे कागदपत्र पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जर आपण लॉगिन करून अपलोड करत असाल तरीसुद्धा लॉगिन करून सांगितलेल्या साईज मध्ये स्पष्ट अशी कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यासाठी 24 सप्टेंबर 2023 पर्यंत आपले हे कागदपत्र अपलोड करण्याचा आव्हान करण्यात आलेला आहे. धन्यवाद..!
अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी 8378955712 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.