Weather Alert : उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट'
23-11-2023
Weather Alert : उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट'
Weather Forecast : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज म्हणजेच गुरुवारी राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापुर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली.
रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धारशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.
source : agrowon