लातूर विभागात सौर कृषीपंप तक्रार निवारणासाठी महावितरणचे मेळावे
29-12-2025

लातूर विभागात सौर कृषीपंप तक्रार निवारणासाठी महावितरणचे मेळावे
निलंगा उपविभागात आज (29 डिसेंबर) थेट तक्रार निवारण
लातूर विभागातील सौर कृषीपंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. सौर कृषीपंपांबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, दुरुस्तीतील विलंब व इतर तक्रारींचे म्हणजेच जागेवरच निवारण करण्यासाठी उपविभागीय स्तरावर विशेष मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आज, 29 डिसेंबर रोजी निलंगा विभागातील उपविभागांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढल्या जाणार आहेत.
तक्रार निवारण मेळाव्यांचे वेळापत्रक
महावितरणने लातूर विभागातील सर्व उपविभागांसाठी खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने मेळावे निश्चित केले आहेत :
26 डिसेंबर
लातूर ग्रामीण
रेणापूर
मुरूड
29 डिसेंबर
औसा
किल्लारी
निलंगा
30 डिसेंबर
कासारशिरसी
शिरूर अनंतपाळ
उदगीर शहर
उदगीर ग्रामीण
31 डिसेंबर
जळकोट
देवणी
शिरूर ताजबंद
अहमदपूर
चाकूर
मेळाव्यात काय सुविधा मिळणार?
या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारींचे थेट आणि त्वरित निवारण केले जाणार आहे.
उपविभागीय अधिकारी उपस्थित
संबंधित शाखा प्रमुख सहभागी
सौर पंप बसवणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित
तांत्रिक अडचणींचे जागेवरच निराकरण
महावितरणने शेतकऱ्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून तक्रारी तत्काळ निकाली काढता येतील.
मेळाव्याला येऊ न शकल्यास तक्रार कशी कराल?
जर कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांना मेळाव्याला उपस्थित राहता आले नाही, तर तक्रार नोंदवण्यासाठी इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
ऑनलाइन तक्रार
www.mahadiscom.in/solar_MTSKPY
टोल-फ्री क्रमांक
📞 1800-233-3435
📞 1800-212-3435
सौर कृषीपंप योजनेअंतर्गत ५ वर्षांची देखभाल पूर्णपणे मोफत असून, तक्रार नोंदवल्यानंतर निवारणाची माहिती SMS द्वारे दिली जाते.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
सौर पंप बिघाड, इन्व्हर्टर, मोटार, पॅनल, वायरिंग आदी तक्रारी त्वरित नोंदवा
तक्रार करताना पंप क्रमांक व लाभार्थी माहिती सोबत ठेवा
एजन्सीकडून प्रतिसाद मिळत नसेल तर थेट महावितरणकडे तक्रार करा