प्रकाश सापळ्यांच्या मदतीने कीड नियंत्रणाची साधी आणि प्रभावी पद्धत…

27-08-2024

प्रकाश सापळ्यांच्या मदतीने कीड नियंत्रणाची साधी आणि प्रभावी पद्धत…

प्रकाश सापळ्यांच्या मदतीने कीड नियंत्रणाची साधी आणि प्रभावी पद्धत…

पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलनामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाकडे आकर्षित होत असतात.

या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते. बाजारात वेगवेगळे प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. 

प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाही आहे. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात

प्रकाश सापळ्याचे महत्व:

  • प्रकाश सापळे पिकामधील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.
  • हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यासाठी मदत होते.
  • प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.
  • प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे तसेच सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.
  • प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.

पिकांमध्ये लावण्याची पद्धती:

  • प्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी लावावे उदा. एक प्रकाश सापळा प्रति हेक्टर.
  • पिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावा.
  • चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवा.

प्रकाश सापळ्याची उपयोगिता:

  • नर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.
  • प्रकाश सापळ्याची रचना अशा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी सुद्धा त्यांना काही हानी पोहचत नाही.
  • प्रकाश सापळे हे बॅटरी वर सुद्धा चालू शकतात.
  • प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.

पिके तसेच त्यावरील किडींचे प्रकाश सापळ्यामुळे व्यवस्थापन:

धान - खोडकिडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी
कडधान्य - शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, कटवर्म
मका - खोडकिडा
सोयाबीन - उंटअळी व लष्करी अळी
भाजीपाला - फळ व शेंगा पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ, सेमीलुपर
ऊस - पायरिला, हुमणी, तुडतुडा, खोड पोखरणारी अळी
भुईमुग - केसाळ अळी, फुलकिडे
आंबा - पतंग, मोल क्रिकेट 
 

प्रकाश सापळे विकत घेण्यासाठी खालील लिंकवर जा👇

https://www.krushikranti.com/ads/tag/solar-trap
 

कीड नियंत्रण, प्रकाश सापळे, सौर ऊर्जा, पिक संरक्षण, मित्र कीटक, solar power, solar energy, shetkari, kid nashak, saple, शेतकरी, कीड नाशक

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading