महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका IMD चा अलर्ट….
06-09-2024
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका IMD चा अलर्ट….
राज्यामधील काही जिल्ह्यात पावसाने सध्या मोठे रूप धारण केल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये IMD ने दिला आहे (दि.६ सप्टेंबर) चा हवामान अंदाज.
राज्यामधील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस आता आणखीन काही दिवस राहणार असल्याचे दिसत आहे.
राज्यभरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून २ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक देखील वाया गेल्याचे पाहायला मिळले.
त्याबरोबर अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर या भागातला पाऊस काही प्रमाणात कमी झाला होता. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरू आहे. पण विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा....
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच, पुढील ५ दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणारअसा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
तर दुसरीकडे विदर्भामधील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई सह उपनगरात सुद्धा आज शुक्रवारी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.