महाराष्ट्र शेतकरी : अतिवृष्टीच्या नुकसानीवर पीकविमा नाही; नव्या नियमाने धक्का

26-09-2025

महाराष्ट्र शेतकरी : अतिवृष्टीच्या नुकसानीवर पीकविमा नाही; नव्या नियमाने धक्का
शेअर करा

महाराष्ट्र शेतकरी : अतिवृष्टीच्या नुकसानीवर पीकविमा नाही; नव्या नियमाने धक्का

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे शेतमाल, जनावरे आणि घरदार वाहून गेले असून मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडले आहेत. मात्र, यावर्षीच्या पीकविम्याच्या (Crop Insurance) नव्या नियमांमुळे शेतकऱ्यांना पूर्वीसारखी भरघोस नुकसानभरपाई मिळणार नाही.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीकविमा योजनेच्या नव्या नियमानुसार केवळ उत्पादनाधारित नुकसानावरच भरपाई मिळेल. यामध्ये मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आली आहे. जुन्या योजनेप्रमाणे उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग यासारख्या घटकांचा समावेश राहणार नाही. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत मिळणार नाही.

त्याऐवजी शेतकऱ्यांना मदत एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार दिली जाईल. पापळकर यांनी सांगितले की, जुलै व ऑगस्ट महिन्याचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांचे अहवाल शासनाकडे सादर झाले आहेत. आतापर्यंत ६९७ कोटी रुपये मिळाले असून आणखी ७२१ कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत.

शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून मिळणारी रक्कम वेळेत खात्यात पोहोचण्यासाठी तालुका पातळीवर विशेष टीम कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

ref : abplive

पीकविमा

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading