महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता – जिल्हानिहाय अंदाज
25-10-2025

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता – जिल्हानिहाय अंदाज
आजपासून, २५ ऑक्टोबरपासून २८ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाहीर झाली आहे. या काळात उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे.
तारीख-वार जिल्हानिहाय पावसाचा अंदाज:
- २५ ऑक्टोबर: नाशिक, जळगांव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर 
- २६ ऑक्टोबर: मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छ.संभाजीनगर, नांदेड 
- २७ ऑक्टोबर: धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छ.संभाजीनगर 
- २८ ऑक्टोबर: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड 
पावसाची शक्यता का?
आज पूर्व-मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्यपासून ५७० किमी अंतरावर कमी दाब क्षेत्र आहे, जे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. परिणामी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात हे कमी दाब क्षेत्र उत्तर व ईशान्येकडे मार्गक्रमण करू शकते.
याशिवाय, आग्नेय बंगालच्या उपसागरी क्षेत्रातील कमी दाब क्षेत्र उद्या मध्य बंगाल उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे.
