Panjabrao Dakh: 18 जुलैपासून हवामानात बदल दिसून येईल!! पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज!
17-07-2025

Panjabrao Dakh: महाराष्ट्रात पावसाची उघडीप – शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!
सध्या राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली असली तरी काहीजण अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जर लवकरच पुन्हा पाऊस न पडला, तर उगवलेल्या पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज – दिलासा देणारी माहिती
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी सांगितले की सध्या राज्यात सर्वदूर मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. जर पाऊस झाला, तरी तो विखुरलेल्या स्वरूपाचा असेल. म्हणजेच, काही भागांत पाऊस तर काही भागांत अजिबात नाही.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की:
पूर्व व पश्चिम विदर्भ
दक्षिण व उत्तर महाराष्ट्र
कोकण व खानदेश
या भागांत सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही.
पाऊस कधी बरसणार? – महत्त्वाचे दिवस
पंजाबरावांच्या अंदाजानुसार:
18 जुलैपासून हवामानात बदल दिसून येईल.
यामध्ये नांदेड, लातूर, अक्कलकोट, उदगीर, धर्माबाद, जळकोट या भागांत चांगल्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिणेकडील राज्यांचा प्रभाव
18 जुलैनंतर तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे त्यांच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही चांगला पाऊस होईल.
22 जुलयानंतर राज्यभरात पावसाचे वातावरण
22 जुल्यानंतर संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होईल.
27, 28 आणि 29 जुलै रोजी राज्यभर मुसळधार पाऊस पडेल.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
निष्कर्ष:
पंजाबरावांच्या अंदाजानुसार येत्या 8 ते 10 दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर होईल आणि खरीप हंगामास नवसंजीवनी मिळेल.