Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस!!! 'ह्या जिल्ह्यांना' रेड अलर्ट
20-08-2025

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस!!! 'ह्या जिल्ह्यांना' रेड अलर्ट
राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण(konkan) आणि घाटमाथा भागात सतत मुसळधार सरी कोसळत आहेत. रायगड आणि पुणे(pune) जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
मुंबई(mumbai), ठाणे(thane), पालघर या भागांतही जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाचं कारण काय? (Konkan, Pune, Mumbai, Thane Rain Reason)
हवामान खात्यानुसार मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे.
हा पट्टा दीव, सुरत, नंदुरबार, अमरावतीमार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत गेला आहे.
त्याशिवाय, अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्यालगत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. पुढील ४८ तासांत आणखी पावसाची शक्यता आहे.
नद्या व धरणांची स्थिती
कोल्हापूरची पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे.
राधानगरी धरणाचे ७ पैकी ५ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट(Red Alert) : रायगड, पुणे(Pune) घाटमाथा
ऑरेंज अलर्ट(Orange Alert) : नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे(Thane), मुंबई(mumbai), सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट
समुद्र किनाऱ्याचा इशारा
मुंबई(Mumbai), ठाणे(Thane), रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत ३.४ ते ४.४ मीटर उंच लाटा येणार आहेत.
सिंधुदुर्गमध्ये २.९ ते ४.० मीटर लाटा येण्याचा अंदाज आहे.
समुद्र खवळलेला असून ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहतील.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
शेतात पाणी साचल्यास ताबडतोब निचऱ्याची सोय करा.
ओलाव्यामुळे कीड व रोग वाढू शकतात, त्यामुळे शेताची पाहणी करून उपाययोजना करा.
पाऊस थांबल्यावरच औषधांची फवारणी करा.
जनावरांसाठी कोरडा व सुरक्षित चारा साठवा.
नुकसान झाल्यास महसूल व कृषी खात्याशी संपर्क करून पंचनाम्यात नाव नोंदवा आणि पीक विमा योजनेचा लाभ घ्या.
मच्छीमारांसाठी सल्ला
सर्व नौका आणि होड्या सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा.
जाळी, दोरखंड व्यवस्थित घट्ट बांधा.
समुद्रकिनाऱ्याजवळ जाणं टाळा.