Maharashtra Weather Alert: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह मुसळदार पावसाचा अंदाज

15-10-2025

Maharashtra Weather Alert: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह मुसळदार पावसाचा अंदाज
शेअर करा

Maharashtra Weather Alert: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह मुसळदार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात मॉन्सून हळूहळू मागे सरकला आहे, त्यामुळे राज्यात उन्हाचा जोर कायम आहे. परंतु हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

आजचे हवामान

  • कोकण: रत्नागिरी, सिंधुदुर्ग

  • मध्य महाराष्ट्र: अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर

  • मराठवाडा: जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव

या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, रायगड, जळगाव, नाशिकमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात उन्हाचा जोर राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारचे हवामान

गुरुवारी कोकणातील सिंधूदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या भागात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारचे हवामान

पालघर आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा आहे. ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनची स्थिती

मॉन्सून पुढील २४ तासात संपूर्ण देशातून मागे सरकण्याचा अंदाज आहे. आज मॉन्सूनची परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर आणि चांदबली दरम्यान आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप, केरळ, आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra weather update, महाराष्ट्र पाऊस 2025, कोकण पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र हवामान, मराठवाडा पावसाची शक्यता, मॉन्सून अपडेट, महाराष्ट्र हवामान

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading