रेशीम उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान सुरू
12-12-2023
रेशीम उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी महारेशीम अभियान सुरू
रेशीम व्यवसाय हा शेतीशी संबंधित व्यवसाय आहे. हा व्यवसाय अतिशय कमी खर्चात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यासह केला जाऊ शकतो. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्यामुळे राज्यात दरवर्षी तुतीच्या लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना राबवली जाते. तसेच, राज्यात रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी महारेशीम नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा रेशीम कार्यालयाने शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुती लागवड जोपासना व कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मजुरी व साहित्य खरेदीसाठी निधी दिला जातो. त्यानुसार, ही महारेशम नोंदणी मोहीम रेशीम शेती करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. हे महारेशीम नोंदणी अभियान दि. २० डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.
किती आर्थिक मदत...
- रेशीम उद्योगासाठी सरकारी स्तरावर दोन महत्त्वाच्या योजना आहेत.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना राबवली जात आहे. यामध्ये तीन वर्षांसाठी 3,97,335 रुपयांचा समावेश आहे. हा निधी मजुरी आणि साहित्यासाठी दिला जातो.
- तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या सिल्क समग्र या माध्यमातूनही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
- या योजनेंतर्गत तुतीच्या लागवडीसाठी 45 हजार रुपये आणि ठिबक सिंचनासाठी 45 हजार रुपये प्रति एकर दिले जातील. संगोपन गृहासाठी दोन लाख ४३ हजार, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रु., निर्जंतुकीकरण साहित्यासाठी तीन हजार ७५० रु. दिले जातात.
या योजनेसाठी प्राधान्यक्रमः
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- विमुक्त जमाती
- दारिद्र रेषेखालील कुटुंबे
- महिला प्रधान कुटुंबे
- शारीरिक अपंगत्व असलेले शेतकरी
- भुसुधार योजनेचे लाभार्थी
नोंदणीसाठीचे निकषः
- अल्पभूधारक शेतकरी असावेत.
- जॉब कार्ड असायला हवे
- सिंचनाच्या सुविधा असाव्यात.
- एका गावात पाच लाभार्थी मिळावेत.
- कृती आराखड्यात असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेः
- सातबारा आठ ‘अ’
- चतु:सीमा नकाशा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरोक्स
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयासोबत संपर्क साधावा.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇