आंबा मोहोर टिकवण्यासाठी प्रभावी उपाय कोणते..?
10-01-2025
आंबा मोहोर टिकवण्यासाठी प्रभावी उपाय कोणते..?
आंबा पिक सध्या पालवी ते फळधारणेच्या अवस्थेत आहे. या कालावधीत तुडतुड्यांचा (Mango Jassids) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तुडतुड्यांनी मोहर आणि कोवळ्या फळातील रस शोषून घेतल्यामुळे मोहराची गळ होते आणि उत्पादनात घट होते.
तुडतुड्यांचा प्रादुर्भाव:
तुडतुड्यांमुळे झाडावरच्या मोहराची आणि कोवळ्या फळाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. हे कीटक झाडाचा रस शोषून घेतात, ज्यामुळे मोहर गळून पडतो. तसेच तुडतुड्यांच्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो, ज्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.
ही बुरशी झाडाच्या पानांवर आणि फळांवर पसरते, ज्यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते.
उपाययोजना:
तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात:
पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी:
बोंगे फुटण्याच्या अवस्थेतील झाडांवर मोहर फुटण्यासाठी, १% पोटॅशिअम नायट्रेट (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याची पालवीवर फवारणी करावी.
नियमित निरीक्षण:
आंबा पिकाची नियमितपणे तपासणी करावी. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणासाठी योग्य ती रासायनिक प्रक्रिया करावी.
सेंद्रिय उपाय:
सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो.