आंब्याला चांगला मोहोर लागण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि मार्गदर्शन
16-10-2025

आंब्याला चांगला मोहोर लागण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि मार्गदर्शन
आंबा फळपिकात मोहर निर्मिती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक घटकांचा समन्वय साधल्याशिवाय फक्त मोहोर दिसणे कठीण असते. यासाठी पाण्याचा योग्य ताण देणे अत्यावश्यक आहे
ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ताण आवश्यक
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान अडीच ते तीन महिने आंबा बागेला चांगला ताण आवश्यक आहे. या ताणाचा प्रकार जमिनीच्या प्रतीनुसार असावा. मोहोर फुटून बाजरीच्या आकाराचे फळ येईपर्यंत बागा तानावरच ठेवली पाहिजे. यामुळे आंबा उत्पादकता वाढविण्याची मोठी संधी निर्माण होते.
बागेची शास्रीय पद्धतीने मशागत
आंबा बागेची शास्रीय पद्धतीने मशागत करणे
अतिघन लागवडीत दरवर्षी छाटणी करणे
जास्तीच्या फांद्यांची विरळणी करणे
फळे काढणीनंतर योग्य हाताळणी सुविधा वापरणे
भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळण्यासाठी डोअर विंडो पद्धत वापरणे
यामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादन निश्चितपणे वाढते.
मोहोर वाढीसाठी छाटणी आणि संजीवकांचे संतुलन
आंबा फळांच्या मध्य फांदीची ऑक्टोबरमध्ये छाटणी केल्यास झाडास ताण मिळतो आणि मोहोर चांगली येते. दरवर्षी मोहर निर्मितीसाठी बागेत वाढ उत्तेजक व वाढ रोधक संजीवकांचे संतुलन राखल्यास फळधारणा सुधारते आणि बागेत उत्पादन निश्चित होते.