परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई...

12-08-2024

परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई...

परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीची कारवाई...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री सध्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोला-चिंचोली रोडच्या बाजूला दररोज सायंकाळी डाळिंब खरेदी विक्रीचा बाजार मांडला.

या घटनेचा सांगोला बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातील सौदे बंद पडतात की काय, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

सांगोला बाजार समितीच्या वतीने व्यापारी व परप्रांतीय व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक शनिवारी बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

बाजार समितीचा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती समाधान पाटील यांनी सांगितले आहे.

डाळिंबाचे कोठार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सांगोला या तालुक्यात डाळिंबाची खरेदी व विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने परराज्यामधील व्यापारी सांगोल्यात वास्तव्यास आहेत.परप्रांतीय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डाळिंब खरेदी करू लागल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची एक मोठी अडचण निर्माण झाली आहे.

परप्रांतीय व्यापारी सांगोला-चिंचोली रोड लगत दररोज दुपारी ४ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत डाळिंबाची खरेदी विक्री करून रस्त्यालगतच बाजार मांडला आहे. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने, दुचाकी वेडीवाकडी उभी केल्यामुळे व रस्त्यालगतच डाळिंबाचे सौदे होत असल्यामुळे उपनगरातील नागरिकांना हा त्रास नित्याचाच झाला आहे.

विविध कारणे सांगून सौदे करण्यास टाळाटाळ:

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तेथे व्यापाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधेसह शेड, गाळे उपलब्ध केलेले असूनसुद्धा परप्रांतीय व्यापारी विविध कारणे सांगून बाजार समितीत सौदे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा परप्रांतीय व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी विक्रीसाठी आपला दबदबा निर्माण केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

बाजार कारवाई, सांगोला बाजार, डाळिंब विक्री, परप्रांतीय व्यापारी, सांगोला डाळिंब, बाजार समिती, डाळिंब खरेदी, market, shetkari, wyapari, शेतकरी, डाळिंब, डाळिंब बाजारभाव, सांगोला, sangola

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading