सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच टोमॅटो दर काय आहेत ?

22-07-2024

सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच टोमॅटो दर काय आहेत ?

सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच टोमॅटो दर काय आहेत ?
 

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

 

सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे शुक्रवारी ११.११ डॉलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१३ डॉलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र सोयाबीनचा भाव कायम होता. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५५० ते ४ हजार ६८० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

कापसाचे भाव टिकून

कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७१.१३ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. देशातही वायदे दबावातच आहेत. मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता. जुलैचा वायदा शुक्रवारी ५६ हजार ४०० रुपयांपर्यंत होता. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

कांदा भाव स्थिरावले

कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

 

टोमॅटोचे भाव तेजीतच

टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा २०० रुपयांपर्यंत वाढला आहे. बाजारातील कमी आणि चांगला उठाव, याचा टोमॅटोच्या बाजाराला आधार मिळत आहे. टोमॅटोचा बाजार सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

 

मक्यातील तेजी कायम

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीत आहे. मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय. पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग आणि इथेनॉल निर्मितीमध्येही मागणी चांगली आहे. यामुळे मका २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २९९९ रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस, सोयाबीन, कांदा, टोमॅटो

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading