पपईचे औषधी गुणधर्म आणि उपयोग...

23-07-2024

पपईचे औषधी गुणधर्म आणि उपयोग...

पपईचे औषधी गुणधर्म आणि उपयोग...

भारतामध्ये पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांत पपई घेतली जाते. 

पपई हे कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक असल्यामुळे अन्य फळपिकांत पपई हे आंतरपीक म्हणून घेतले जाते. पपईचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

पपईतिल औषधी गुणधर्म:

• पपई फळात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असून दररोजच्या आहारात या फळाच समावेश आवश्यक आहे.

• या फळात थायामिन 40 मिलिग्रॅम, रायबोफ्लॅव्हीन 250 मिलिग्रॅम व जीवनसत्त्व क 46 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम गरात आढळते.

• पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मूळव्याध इत्यादी विकारांवर गुणकारी आहे. म्हणूनच म्हणतात, ‘पपईची फोड, पळवे पोटदुखीची खोड!’

• पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते.

• याचा औषधी आणि अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

• पेपेनचा उपयोग मद्यनिर्मिती उद्योगात, सौंदर्य प्रसाधने आणि अपचनाच्या विकारांवरील औषधे बनविण्यासाठी केला जातो.

• पपई खाल्याने डोकेदुखी, अनिद्रा, बद्धकोष्ठता हे आजार ही दूर होतात.

पपई फायदे, औषधी पपई, पपई उपयोग, जीवनसत्त्व अ, पेपेन वापर, पपई गुणधर्म, आहार पपई, फळ औषध, अपचन उपाय, पपई उद्योग, papaya, papai

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading