दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान, राज्यातील संस्थांच्या प्रस्तावात मोठी वाढ…

29-08-2024

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान, राज्यातील संस्थांच्या प्रस्तावात मोठी वाढ…

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान, राज्यातील संस्थांच्या प्रस्तावात मोठी वाढ…

जानेवारी ते मार्च महिन्यातील अनुदानासाठी राज्यामधून २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. आता त्यामध्ये दुप्पटीहून अधिक संस्थांची भर पडत जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्याने ५९० संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मागील अनुदानाला मुकलेल्यांसह राज्यातून ८०४ दूध संस्थांना लॉग इन आयडी देण्यात आलेला आहे.

राज्यामध्ये दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला होता. दूध उत्पादक संघांकडून दिल्या जाणाऱ्या दराशिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत दिलेल्या अनुदानासाठी राज्यातून १८ जिल्ह्यांतील २४४ दूध संस्थांचे प्रस्ताव आले होते. त्या संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते.

त्यानंतरही दूध खरेदी दरात वाढ न होता आणखीन घसरण झाल्याने राज्यातून दूध अनुदान मागणीचा दबाव सरकारवर वाढला. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी २३ जिल्ह्यांतील ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव अनुदानासाठी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. 

कोल्हापूरचा प्रस्ताव नाही:

११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १३ दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमधील अनुदानासाठी एकाही दूध संस्थेने अनुदानासाठी अर्ज केला नाही. त्याशिवाय इतर जिल्ह्यांमधील संस्थांची संख्या वाढली आहेच, शिवाय पाच जिल्हेही वाढले आहेत. येणाऱ्या काळात आणखीन काही संस्था वाढण्याची शक्यता आहे.

 

जिल्हाजानेवारी ते मार्चऑगस्ट ते ऑक्टोबर
पुणे3281
सातारा2458
सोलापूर1889
कोल्हापूर1200
सांगली1230
नागपूर0304
गोंदिया0001
वर्धा0001
भंडारा0202
अहमदनगर74160
जळगाव0212
नाशिक1852
धुळे0309
बीड0612
छ. संभाजीनगर1222
धाराशिव1333
जालना0104
लातूर0106
नांदेड0004
परभणी0004
अमरावती0002
बुलढाणा0202
यवतमाळ0002
एकूण244590

दूध अनुदान, शेतकरी लाभ, संस्था प्रस्ताव, राज्य अनुदान, दूध दर, अनुदान अर्ज, अनुदान, दूध, सरकारी अनुदान, sarkari anudan, doodh

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading