मिनी ट्रॅक्टरसाठी शासकीय अनुदान, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या..!

08-12-2024

मिनी ट्रॅक्टरसाठी शासकीय अनुदान, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या..!

मिनी ट्रॅक्टरसाठी शासकीय अनुदान, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या..!

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर आणि ट्रेलर खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

योजनेचे फायदे:

शासकीय अनुदान: या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठी 90% शासकीय अनुदान दिले जाते.

स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा: फक्त 10% हिस्सा गटाकडून भरायचा आहे.

अर्थसहाय्य मर्यादा: रु. 3,50,000 पर्यंतच्या खरेदीसाठी अनुदानाची मर्यादा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

इच्छुक गटांनी आपले अर्ज 23 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत.

अर्ज कसा करावा…?

ऑनलाईन नोंदणी:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( mahasamajkalyan ) या संकेतस्थळावर भेट द्या.

“ऑन्लाइन अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.

नोंदणीसाठी माहिती भरा:

बचत गटाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्या नावेच नोंदणी करा.

संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी, पासवर्ड, बचत गटाचे नाव, अर्ज करावयाचा जिल्हा ही माहिती भरा.

“Register” बटणावर क्लिक करा.

अर्ज सादर करा:

ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून जोडलेली कागदपत्रे कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

संपर्क माहिती:

अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधा.

महत्त्वाची टिपण:

अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रति जोडा.

वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्या.

आपल्या गटाच्या प्रगतीसाठी या सुवर्णसंधीचा फायदा अवश्य घ्या…!

मिनी ट्रॅक्टर, शासकीय अनुदान, अर्ज प्रक्रिया, स्वयंसहाय्यता गट, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य, अनुदान योजना, बचत गट, आर्थिक सहाय्य, ट्रॅक्टर खरेदी, सरकारी योजना, शेतकरी, gov scheme

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading