महाराष्ट्रात मान्सूनचा जोर, अनेक जिल्ह्यांना अलर्ट...
21-07-2024
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर, अनेक जिल्ह्यांना अलर्ट...
यंदा राज्यभरात चांगला पाऊस पडल्याच दृश्य समोर येत असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे व मराठवाडा वगळता कोकण आणि विदर्भात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. हवामान विभागाने काल ८ जिल्ह्यांत रेड अलर्ट वर्तवला होता.
त्यामधील कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होता. त्याबरोबरच, कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा, मराठवाड्यातील एक जिल्हा आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासंह व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सांगली, सोलापूर, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.
येलो अलर्ट कुठे आहे?
कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील नांदेड सोडून सर्वच जिल्हे, तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट कुठे आहे?
कोकणामधील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रेड अलर्ट कुठे आहे?
कोकणामधील रत्नागिरी व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, सांगली व सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.