Weather forecast new updates : यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिरा

26-09-2023

Weather forecast new updates : यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिरा

Weather forecast new updates : यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिरा

सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैॡत्य राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदाही तब्बल आठ दिवसाने (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरुवात केली आहे. २ जूलै रोजी संपूर्ण देशात पोचलेल्या मॉन्सूनने २ महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.

दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जून रोजी राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत (२५ जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात पोचला होता.

वायव्य भारतात ८५० हेप्टापास्कल उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र (ॲण्टी सायक्लोन) तयार झाले आहे. नैॡत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तसेच या भागात आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन हवामान कोरडे झाले आहे. या पूरक स्थितीमुळे नैॡत्य राजस्थानमधून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नौखरा, जोधपूर, बारमेर पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतल्याने हवामान विभागाने म्हटले आहे.


वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीची वाटचाल
वर्ष---तारीख
२०१८ ला २९ सप्टेंबर

२०१९ ला ९ ऑक्टोबर

२०२० ला २८ सप्टेंबर

२०२१ ला ६ ऑक्टोबर

२०२२ ला २० सप्टेंबर

२०२३ ला २५ सप्टेंबर

 

monsoon rain, rainfall alert, monsoon update, return monsoon.

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading