मान्सून अपडेट विदर्भ आणि पुणे जिल्ह्यात तुफान पावसाचा अलर्ट…

29-06-2024

मान्सून अपडेट विदर्भ आणि पुणे जिल्ह्यात तुफान पावसाचा अलर्ट…

मान्सून अपडेट विदर्भ आणि पुणे जिल्ह्यात तुफान पावसाचा अलर्ट…

राज्यात मान्सूनला सुरुवात होताच पावसाने ओढ दिल्याचे दिसून येत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसह मराठवाड्यात पावसाने 'ब्रेक' घेतलेला आहे. या दरम्यान, कोकणासह मुंबई, पुणे, साताऱ्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या इशान्य अरबी समुद्राला जोडून सौराष्ट्रापर्यंत असून तर बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात सक्रिय आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

१९ ते २१ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता.  पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाचे, पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

आज संपूर्ण विदर्भाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ४५ ते ५० किमी प्रतितास राहणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस राहण्याची शक्यता आहे.

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

मध्य महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी हलक्या सरींच्या पावसाची शक्यता असून सातारा आणि पुणे जिल्ह्यास जोरदार पावसाचा अलर्ट आहे. कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर आणखी वाढणार असून या जिल्हाांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सून अपडेट महाराष्ट्र, विदर्भ पावसाचा अलर्ट, पुणे पावसाची शक्यता, महाराष्ट्र हवामान अंदाज, चक्राकार वाऱ्यांची स्थिती, कोकण पावसाचा ब्रेक, rain, farmers, shetkari

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading