मुंबई, उपनगर आणि ठाण्यात पेस्ट कंट्रोल व किटकनाशक विक्रीसाठी परवाना सक्तीचा
29-12-2025

मुंबई, उपनगर आणि ठाण्यात पेस्ट कंट्रोल व किटकनाशक विक्रीसाठी परवाना सक्तीचा
विनापरवाना व्यवसाय केल्यास थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात किटकनाशकांची विक्री, साठवणूक तसेच पेस्ट कंट्रोल (फवारणी) सेवा देण्यासाठी कृषी विभागाचा परवाना घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. कृषी विभागाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरगुती किटकनाशके विकणारे दुकानदार, तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणारे व्यावसायिक यांनी या नियमांची तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे.
नेमके काय बंधनकारक करण्यात आले आहे?
कृषी विभागाने स्पष्ट केलेल्या नियमांनुसार खालील सर्व बाबींसाठी परवाना अनिवार्य आहे:
किटकनाशकांचा साठा व विक्री (घाऊक व किरकोळ)
झुरळ, उंदीर, ढेकूण, डास, मुंग्या यांसाठी वापरली जाणारी घरगुती किटकनाशके विक्री
घर, सोसायटी, कार्यालये, दुकाने याठिकाणी केली जाणारी
किटकनाशक फवारणी / पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स
म्हणजेच, फक्त शेतीसाठीच नव्हे तर घरगुती वापरासाठीच्या किटकनाशकांनाही परवाना आवश्यक आहे.
कोणावर थेट कारवाई होऊ शकते?
कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून पुढील प्रकारच्या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई होऊ शकते:
मेडिकल स्टोअर्स
किराणा दुकाने
सुपर मार्केट्स
हार्डवेअर / जनरल स्टोअर्स
विनापरवाना पेस्ट कंट्रोल सेवा देणाऱ्या कंपन्या व व्यक्ती
जर ही आस्थापने परवाना नसताना किटकनाशके विकत किंवा फवारणी करत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई होऊ शकते.
कोणत्या कायद्याअंतर्गत ही कारवाई होणार?
ही कारवाई खालील केंद्र शासनाच्या कायद्यांवर आधारित आहे:
किटकनाशके अधिनियम, 1968
किटकनाशके नियम, 1971
या नियमांनुसार परवाना न घेता व्यवसाय करणे हे
किटकनाशके नियम 1971 मधील नियम 10 चे उल्लंघन मानले जाते.
यासाठी दंड, व्यवसाय बंद करण्याचे आदेश तसेच कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
परवान्याबाबत महत्त्वाच्या अटी
घरगुती किटकनाशक साठा व विक्रीचे परवाने कायमस्वरूपी स्वरूपात दिले जातात
परवान्यात नमूद केलेल्या उत्पादनांच्या उगम प्रमाणपत्रात (Source Certificate) बदल झाल्यास, ते परवान्यात अद्ययावत करणे बंधनकारक
प्रतिबंधित किंवा विशेष किटकनाशके वापरण्यासाठी स्वतंत्र परवाना आवश्यक
फक्त मान्यताप्राप्त किटकनाशकेच वापरणे व विकणे कायदेशीर आहे
पेस्ट कंट्रोल व्यवसायिकांसाठी धोका काय?
जर पेस्ट कंट्रोल सेवा देणारी व्यक्ती किंवा कंपनी:
परवाना नसताना फवारणी करत असेल
अनधिकृत किंवा प्रतिबंधित रसायनांचा वापर करत असेल
प्रशिक्षण नसलेल्या कामगारांकडून फवारणी करून घेत असेल
तर अशा प्रकरणांत थेट कायदेशीर कारवाई, दंड व व्यवसाय बंद होण्याचा धोका संभवतो.
परवाना का महत्त्वाचा आहे?
परवाना प्रणालीमागील उद्देश:
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण
विषारी व धोकादायक रसायनांचा गैरवापर रोखणे
दर्जेदार आणि सुरक्षित पेस्ट कंट्रोल सेवा सुनिश्चित करणे
बनावट व अवैध किटकनाशकांचा बाजार बंद करणे
अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा?
परवाना, नियम किंवा प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग
7 वा मजला, धर्मवीर आनंद प्रशासकीय इमारत,
काशीश पार्क, एल.बी.एस. रोड,
तीन हात नाका, ठाणे (प.) – 400604
📞 संपर्क क्रमांक: 8691058094