नमो शेतकरी महासन्मान निधी, चौथा हप्ता कधी मिळणार
24-08-2024
नमो शेतकरी महासन्मान निधी, चौथा हप्ता कधी मिळणार
केंद्र सरकराच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात सुरूवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळतो.
त्या दरम्यान, राज्य सरकारने मागच्या एका वर्षापूर्वी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा केली. त्याद्वारे पीएम किसान योजनेद्वारे जसे प्रतीवर्षी ६ हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याप्रमाणे राज्य सरकारनेही त्यामध्ये भर घालून ६ हजार रूपये देण्याची घोषणा केली. या योजनेचे आत्तापर्यंत तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
राज्य सरकारकडून या योजनेद्वारे आत्तापर्यंत तीन हप्त्यापोटी ५ हजार ५९२ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे. तर चौथ्या हप्त्यासाठी सरकारने २ हजार ४१ कोटी रूपये खर्च केले असून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान योजना अशा योजना लागू करून सरकार शेतकऱ्यांना व नागरिकांना आळशी बनवण्याचं काम करतंय, पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा जास्त विमा कंपन्यांना होतोय असा आरोप शेतकरी करत आहेत.
तसेच या योजनेतून शेतकऱ्यांना तटपुंजी रक्कम देण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.