आता शेतकाऱ्यांकडून गाईचे शेण 1Rs प्रती किलोने केले जाईल!!!
18-09-2025

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) शेतकाऱ्यांकडून गाईचे शेण 1Rs प्रती किलोने खरेदी करणार
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) ने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. यातून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि गावातील शेणाचे ढिगारे कमी होतील. देशातील गुजरात, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा आणि बिहार या ६ राज्यांमध्ये १५ नवीन बायोगॅस प्लांट्स उभारले जात आहेत.
या योजनेत काय होणार?
या प्लांटसाठी दररोज १,५०० टनांपेक्षा जास्त गाईचे शेण लागणार.
शेतकऱ्यांकडून हे शेण प्रति किलो १ रुपयाला खरेदी केले जाईल.
एका प्लांटची क्षमता १०० टन प्रतिदिन असेल आणि खर्च साधारण ५० कोटी रुपये येईल.
या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च ७५० कोटी रुपये आहे.
शेतकऱ्यांना कसा फायदा?
शेण विकून अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
गावातले शेणाचे ढिगारे, दुर्गंधी आणि अस्वच्छता कमी होईल.
स्वच्छ ऊर्जा (बायोगॅस, बायो-CNG) तयार होईल.
ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना मिळेल.
कुठे सुरु झाले आहेत प्रकल्प?
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात पहिला प्लांट सुरु झाला आहे.
येथे गाईचे शेण आणि बटाट्याचे अवशेष वापरून बायो-CNG तयार केली जाते.
एनडीडीबीने सुजुकी कंपनी आणि बनास डेअरी सोबत करार करून आणखी ४ प्लांट्स उभारत आहे.
उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे १०० टन क्षमतेचा प्लांट सुरु आहे.
याठिकाणी शेतकऱ्यांकडून घराघरातून शेण गोळा केले जाते.
इतर डेअऱ्या देखील सहभागी
गुजरातमधील अमूल डेअरी, दूधसागर डेअरी, बडोदा डेअरी, साबर डेअरी
गोव्याची सहकारी डेअरी
महाराष्ट्रातील महानंदा डेअरी
राजस्थान, ओडिशा आणि बिहारमधील प्रमुख डेअऱ्या
सध्या या उपक्रमांतून दररोज ४-५ हजार क्युबिक मीटर बायोगॅस तयार होत आहे. पुढे प्लांट्स वाढल्यावर उत्पादन खूप वाढणार आहे. थोडक्यात, शेतकऱ्यांना शेण विकून पैसा मिळेल, गावं स्वच्छ राहतील आणि देशाला स्वच्छ इंधन मिळेल.