न्यूट्रोजेल - कमी पाण्यामध्ये पिकवा भरपूर उत्पादन…
30-08-2024
न्यूट्रोजेल - कमी पाण्यामध्ये पिकवा भरपूर उत्पादन…
न्यूट्रोजेल या खताचा वापर शेतामध्ये केला जातो तेव्हा हे दाणेदार खत दिलेले पाणी तसेच पावसाचे पाणी शोषून घेते.
त्यामुळे जेव्हा पिकाला पाण्याची कमतरता भासते तेव्हा न्यूट्रोजेल मधून पाणी झिरपते आणि पिकाच्या मुळाशी ओलावा टिकून ठेवते.
किती प्रमाणात करावा वापर..?
एकरी 3 ते 5 किलो (फळझाडांना पिकाच्या वयानुसार 50 ते 60 ग्राम प्रती झाड).
काय आहेत फायदे.?
- प्रत्येक पिकास उपयुक्त ठरते.
- मातीचा पोत सुधारण्यास मदत करते.
- पिकाला गरजेनुसार हळूहळू पाणी उपलब्ध करून देते.
- एकदा वापरल्यावर 6 महीने जमिनीमध्ये कार्य करते.
- पोटॅश या मुख्य अन्नद्रवाची कमतरता भासू देत नाही.
- अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये झिरपून जाणारे खत साठवून ठेवते.