एका वेताला 3500 लिटर पर्यंत दूध देणारी गाईची जात
01-01-2023
एका वेताला 3500 लिटर पर्यंत दूध देणारी गाईची जात
सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी सध्या समाधानी आहेत. असे असताना गाईची अशी एक जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी दुधाची गंगा वाहू लागली आहे.
ही जात म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली फुले त्रिवेणी जात होय. फुले त्रिवेणी ही गाईची एक सुधारित जात आहे. या गाईची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही होलस्टेन फ्रीजियन ५० टक्के, जर्सी २५ टक्के व गीर २५ टक्के या जातींचा संकर आहे.
यामुळेच या गाईला फुले त्रिवेणी असे नाव देण्यात आले आहे. या जातीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन मिळत आहे. ही जात एका वेतात 3000 ते 3500 लिटरपर्यंत दूध देत आहे.
तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या जातीमध्ये मूळ जातीची गाय जेवढे उत्पादन देते तिची पुढील पिढी देखील तेवढे उत्पादन देते.
या जातीचे वळुंचे गोठीत वीर्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील हवामानात या जातीचे संगोपन फायदेशीर आहे. यामुळे तज्ञांकडून या गाईच्या संगोपनाचा सल्ला दिला जातो.
टीप : अशाप्रकारे शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या whatsapp ग्रुपला जोडले जा ➡ येथे क्लिक करा
source : krishijagran