रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचा अडथळा…

23-07-2024

रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचा अडथळा…

रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचा अडथळा…

अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यात मे महिन्यामध्ये शासकीय हमी भावात शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी केंद्र बाळापूर येथे सुरू होते. खरेदी केंद्राच्या गोदामात जागा नसल्यामुळे २१ दिवसांपासून ज्वारी खरेदी बंदच आहे, तर ३१ जुलैला शासनाचे खरेदी केंद्र हे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीला योग्य भाव मिळण्यासाठी ३१८० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी सुरू होती. त्यासाठी बाळापूर तालुक्यातील ज्वारी खरेदीचे ४२९५ क्विंटल उद्दिष्ट निर्धारित केले होते. ४२८० क्विंटल ज्वारी खरेदी करून केंद्र जूनमध्ये बंद करण्यात आले.

१२४४ शेतकर्‍यांनी ज्वारी विक्रीसाठी ऑन लाइन नोंदणी केली होती. त्यामधील केवळ ९६ शेतकर्‍यांनी ४२८० क्विंटल ज्वारी शासकिय ज्वारी खरेदी केंद्र येथे विकली.

गोदाम भाडेबाबत अद्यापही नाही:

बाळापूर येथील ज्वारी खरेदी केंद्रातील गोदाम क्षमता नसल्याने नवीन खासगी गोदाम शोधण्यात १५ दिवस गेले. दोन दिवसांपूर्वी रिधोरा परिसरातील गोदाम घेण्याचे ठरले. परंतु, गोदाम भाडेविषयी अद्यापही निर्णय न झाल्याने ज्वारी खरेदी केंद्र सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता आहेत.

१२,८०० क्विंटल उद्दिष्ट वाढविले…

शासनाने १२,८०० क्विंटलचे टप्पा वाढवून खरेदी केंद्र चालवण्याची परवानगी दिली. या पूर्वीच्या कंपनीने शेतकर्‍यांची केलेली नोंदणी अमान्य करून नवीन नोंदणी करायचे सांगितले. पण, नोंदणी पोर्टल बंद आहे. 

यापूर्वी ११४८ नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याविषयी शेतकरी खरेदी विक्री संघ सोसायटी येथे भेट देत आहेत.

ज्वारी खरेदी, शेतकरी चिंता, बाळापूर तालुका, हमी भाव, खरेदी केंद्र, गोदाम क्षमता, ऑनलाईन नोंदणी, शासकीय खरेदी, रब्बी हंगाम

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading