महावितरणचा 'ऊर्जा' चॅटबॉट, वीजग्राहकांसाठी एका क्लिकवर सेवा...

07-09-2024

महावितरणचा 'ऊर्जा' चॅटबॉट, वीजग्राहकांसाठी एका क्लिकवर सेवा...

महावितरणचा 'ऊर्जा' चॅटबॉट, वीजग्राहकांसाठी एका क्लिकवर सेवा...

हिंगोली शहरांसह ग्रामीण भागात वीजप्रश्न सुटता सुटत नसल्याचे दृश्य दिसून येत आहे. काही वेळा आंदोलने देखील होतात, मोर्चे निघतात. पण, वीजप्रश्न सुटत नाही. शिवाय तक्रारीची दखलही कुणी घेत नसल्याचा अनुभव वीज ग्राहकांसाठी कायमचा आहे.

त्यामुळे आता महावितरणच्या वतीने वीज गेली, खांब पडला किंवा इतर काही समस्या असेल तर एका क्लिकवर सेवा मिळणार असे जाहीर केले आहे. महावितरणची ही सेवा खरेच फायद्याची ठरेल का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महावितरणने राज्यामधील ३ कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी 'ऊर्जा' चॅटबॉट महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महावितरणच्या वीजसेवेबाबत ग्राहकांना माहिती हवी असल्यास ऊर्जा चॅटबॉटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध झाली आहे. संबंधित सेवेच्या थेट लिंक ग्राहकांना या चॅटबॉटमधूनच देण्यात आलेल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होणे, वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

तर जाणून घेऊया काय आहे ऊर्जा चॅट बॉट..?

ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी 'ऊर्जा' नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. 

इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतात. तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण याबाबत माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कसा करणार वापर..?

राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी असलेल्या 'ऊर्जा' चॅटबॉटचा वापर करायचा आहे. वेबसाइट ओपन केल्यानंतर नोंदणी केलेला मोबाइल नंबर टाकायचा, त्यानंतर गरजेनुसार पर्याय निवडायचा आहे.

कशासाठी करणार वापर..?

मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी, इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, अर्जाची सद्यःस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेशन आदी सेवांबाबत वीज ग्राहकांना 'ऊर्जा चॅटबॉट'चा वापर करता येतो.

मोबाइलवरूनच नोंदविता येणार तक्रार "ऊर्जा चॅटबॉट"चा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून, त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही.

मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक किवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणशी सरळ संवाद साधता येईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

ऊर्जा चॅटबॉट, वीज सेवा, वीज तक्रार, महावितरण सेवा, ऑनलाइन तक्रार, वीज बिल, वीजपुरवठा खंडित, सेवा सुविधा, चॅटबॉट वापर, ग्राहक संवाद, वीज समस्या, वीज जोडणी, ऑनलाइन सेवा, vij, mahavitaran, lite, लाइट

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading