E-Pik Pahani : ऑनलाईन ई-पीक पाहणी घरबसल्या करा तुमच्या मोबाईलवरून
09-09-2023
E-Pik Pahani : ऑनलाईन ई-पीक पाहणी
घरबसल्या करा तुमच्या मोबाईलवरून
प्रकल्पाचे नाव | ई-पीक पाहणी |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | पिकांच्या पेरणीची नोंदणी |
उद्देश्य | पिकाचे नुकसान झाल्यास त्वरित लाभ देणे शक्य |
नोंदणी पद्धत | अँप च्या सहाय्याने |
ई-पीक पाहणीचा उद्देश (E-Pik Pahani Purpose)
- क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच, सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सादर Data वापरणे या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
- शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
- शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी अँप (online pik pahani) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना (E-Pik Pahani)
- नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
- खातेदाराने ई पीक पाहणी अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
- ७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
- ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत,त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास,त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
- शेतक-यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२ किंवा ८ अ ची अद्ययावत प्रत सोबत ठेवावी.
- सामायिक मालकीच्या जमिनीसाठी,ज्याचे नाव गाव न.नं.७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे,ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
- अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता)नोंदणी करू शकतील.
- खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
- नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
- एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल,तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.
- एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या अटी (E-Pik Pahani Terms And Condition)
- केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत.
- ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करण्यासाठी फक्त अँप चा वापर करण्यात येईल.
ई-पीक पाहणी मोबाईल अँप अंतर्गत पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया (E-Pik Pahani Registration)
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Play Store App यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
- अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
- आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
- अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत तलाठी लॉगिन करण्याची पद्धत (E-Pik Pahani Login)
- तलाठी ला सर्वात प्रथम स्वतःचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर एक निवन पेज उघडेल त्यामध्ये ई पीक हा पर्याय निवडायचा आहे व गावाची निवड करून स्वीकारा बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता तुम्हाला वर्ष,हंगाम निवडून मोबाईल अँप डेटा बटनावर क्लिक करायचं आहे.आता तुमच्या समोर गावातील ज्या खातेदारांनी मोबाईल वरून पीक नोंदणी केली आहे त्यांची यादी दिसेल त्यामध्ये ज्या खातेदारांची पीक नोंदणी तपासायची आहे त्यासमोरील निवडा बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये निवडलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावरील सर्व सर्व्हे नंबर दिसतील. प्रत्येक रेकॉर्ड वरील पीक, त्याचे क्षेत्र,पड क्षेत्र आणि फोटो सर्व गोष्टी योग्य वाटत असतील तर ते रेकॉर्ड तलाठी सेव्ह करु शकतो. त्या पूर्वी क्षेत्र पडताळणी बटन क्लिक करायचे आहे. त्याखेरीज साठवा बटन क्लिक करता येणार नाही. एकदा रेकॉर्ड सेव्ह झाले कि ते पुन्हा दुरुस्त करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तलाठ्याला एखादे रेकॉर्ड चुकीचे वाटले तर ते दुरुस्त करता येईल. त्या करीता त्याने ‘दुरुस्ती’ चे बटन क्लिक करावे.
- प्रत्येक रेकॉर्ड समोर फोटो उपलब्ध असेल तर छायचित्र कॉलम मध्ये Yes दिसेल, अन्यथा छायचित्र कॉलम मध्ये No दिसेल.
- फोटो बघायचा असेल तर फाईल पहा वर क्लिक करा.जे रेकॉर्ड दुरुस्त करायचे ते निवडावे सुरुवातीला तलाठ्याने हंगाम निवडलेला असतो. निवडलेल्या हंगामाचीच पिके यादीमध्ये दिसतात.व त्यातीलाच रेकॉर्डस् दुरुस्त करता येतात.परंतु मोबाईल ऍपद्वारे पिकाची माहिती भरताना शेतकऱ्याच्या हातुन चुकीचा हंगाम निवडला जाऊ शकतो. उदा. उस हे वर्षभर येणारे पीक असल्याने त्याची माहिती भरल्यानंतर तांदुळाची महिती भरताना शेतकऱ्याच्या कडून तांदुळाचा हंगाम खरीप च्या ऐवजी संपूर्ण वर्ष असा भरला जाऊ शकतो. हि चूक तलाठी ‘दुरुस्त’ करु शकतो.त्या करीता तलाठ्याने ‘दुरुस्ती’ चे बटन क्लिक करावे. व ज्या रेकॉर्डमध्ये बदल हवा आहे ते निवडावे.
- त्या नंतर ते रेकॉर्डची माहिती दिसेल, त्यामधील पिकांच्या क्षेत्राची, तसेच पड क्षेत्राची दुरुस्ती करता येईल आणि हंगाम चुकीचा निवडला गेला असेल तर तो योग्य निवडता येईल. पिकांची नावे बदलता येणार नाहीत. तसेच जलसिंचनाचे साधन बदलता येणार नाही.पिकांची नावे बदलता येणार नाहीत. तसेच जलसिंचनाचे साधन बदलता येणार नाही. दुरुस्ती केलेली माहिती समावेश बटन वर क्लिक करून से रेकॉर्ड तलाठी सेव्ह करु शकतो.
- त्या नंतर क्षेत्र पडताळणी बटन क्लिक करायचे आहे त्याखेरीज साठवा बटन क्लिक करता येणार नाही.एकदा रेकॉर्ड सेव्ह झाले कि ते पुन्हा दुरुस्त करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या समाविष्ट अवस्था कोणत्या आहेत?
- पीक पेरणी नंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक
- पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था
- कापणी (हंगाम) पूर्वीची अवस्था