Orange Rate : सध्या संत्र्याच्या दरात चांगलीच सुधारणा

24-11-2023

Orange Rate : सध्या संत्र्याच्या दरात चांगलीच सुधारणा

Orange Rate : सध्या संत्र्याच्या दरात चांगलीच सुधारणा

आंबिया बहारातील संत्र्याची बागायतदारांना कमी दरात विक्री करावी लागली होती. पण आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना संत्र्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली असून २५ ते ३० हजार रुपये टन याप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत आहेत.

श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनी लि. वरुड (अमरावती) चे संचालक रमेश जिचकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्या बाजारात सरासरी दर्जाच्या संत्रा फळांना २८ ते ३० हजार रुपये प्रतिटनाचा दर मिळत आहे. ७० ते ७५ एमएम आकाराचा संत्रा ३२ आणि ७५ ते ८० एमएम आकाराचा संत्रा ३४ रुपये दराने विकला जात आहे.

आंबिया बहारातील संत्र्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जेमतेम दीड महिनाच हंगाम असल्याने फळांचे दर तेजीत आहेत. तसेच या काळात संत्र्याची रंगधारणा आणि त्यातील गोडवा वाढीस लागतो. परिणामी ग्राहकांची या फळांना अधिक मागणी राहते. याउलट उत्तरेत हिरव्या फळांना मागणी राहते.

छठपूजा काळात ही मागणी वाढते. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. आमच्या शेतकरी कंपनीने ६५० टनांची खरेदी केली आहे. सरासरी २५ हजार रुपये टनांचा दर अपेक्षित धरता दीड कोटी रुपयांपेक्षा अधिकची ही खरेदी आहे. यातून शेतकऱ्यांनाही चांगला परतावा मिळाला, असेही जिचकार म्हणाले.

लहान फळांना १२ रुपयांचा दर

हंगामाच्या सुरवातीला मागणीअभावी १५ ते २२ हजार रुपये प्रतिटन दर संत्रा फळांना होता. आता ४५ ते ५५ एमएमच्या आतील चुरी फळांना (लहान फळे) १० ते १२ रुपये किलोचा दर आहे. अशी फळे प्रक्रिया उद्योगात वापरली जात असतात.

आंबिया बहाराची ४ लाख टनांची उत्पादकता अपेक्षित धरल्यास त्यातील २० टक्‍के म्हणजे ५० हजार टन संत्रा शिल्लक आहे. सद्या संत्र्यामध्ये गोडवा आणि रंगधारणा वाढीस लागली आहे. त्यामुळे मागणी वाढत दरातही सुधारणा झाली आहे. सरासरी २५ ते ३० हजार रुपये टनाप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत आहेत.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

 

 

Orange Rate, orange, bajarbhav

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading