Panjab Dakh : राज्यात आजपासून पावसाला उघडीप - पंजाब डख
02-12-2023
Panjab Dakh : राज्यात आजपासून पावसाला उघडीप - पंजाब डख
राज्यात आजपासून पावसाला उघडीप राहणार आहे आणि हवामान कोरडे होणार आहे, जवळपास गेले आठ दिवस राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय, खूप जणांचं नुकसान झालं आहे. राज्यात आजपासून राज्यामध्ये हवामान कोरड राहणार आहे. राज्यांमध्ये परत मग पाऊस कधी येणार तर राज्यात आता फार काही मोठा पाऊस पडणार नाही, फक्त दिनांक ६ डिसेंबर, ७ डिसेंबर आणि ८ डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहील.
पूर्व विदर्भात, सर्व नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना, लातूर, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती या भागामध्ये सहा सात आठ डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यानंतर सहा सात आठ डिसेंबर दरम्यान थोडी रिमझिम पाऊस पडणारे आणि हा पाऊस नांदेड, लातूर, उदगीर त्या भागाकडे पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर यवतमाळ भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस येणारे, अकोला अमरावती भागात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे.
राज्यात आता काही मोठा पाऊस पडणार नाही हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. उद्या दोन डिसेंबर पासून हवामान कोरडे राहणार आहे पण फक्त ६ डिसेंबर आणि ८ डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहील. जर अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच तुम्हाला एक उपडेट दिले जाईल, धन्यवाद.