weather : राज्यात 25 ते 27 नोव्हेंबेर दरम्यान पावसाची शक्यता - पंजाब डख
20-11-2023
weather :राज्यात 25 ते 27 नोव्हेंबेर दरम्यान पावसाची शक्यता - पंजाब डख
weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशभरासह राज्यात देखील जाणवू लागला आहे. वातावरण बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
पंजाब डंख यांनी आज नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे, त्यानुसार राज्यामध्ये 25 नोव्हेंबेर, 26 नोव्हेंबेर, 27 नोव्हेंबेर ला पाऊस येण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे. राज्यामध्ये 25 नोव्हेंबेर ते 27 नोव्हेंबेर दरम्यान विदर्भाचा काही भाग, मारठवड्याचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टि भागात पाऊस येणार आहे.
सध्या येणार पाऊस हा अवकळी पाऊस आहे, त्त्यामुळे तो सगळीकडे पडणार नाही, तर राज्यात तुरळक ठिकाणी पडणार आहे. राज्यात 25 नोव्हेंबेर पासून बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडणार आहे.
राज्यात 24 नोव्हेंबर पासूनच ढगाळ वातावरण दिसायला लागेल. राज्यातील उर्वरील भागामध्ये हवामान कोरडे राहील तसेच ढगाळ वातावरण राहील.
एकंदरीत राज्यामध्ये 24 नोव्हेंबेर पासून ते 27 नोव्हेंबेर पर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे.