सोयाबीन आणि तीळ पिकांचे नवे कीड व रोगप्रतिरोधक वाण...

23-10-2024

सोयाबीन आणि तीळ पिकांचे नवे कीड व रोगप्रतिरोधक वाण...

सोयाबीन आणि तीळ पिकांचे नवे कीड व रोगप्रतिरोधक वाण...

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला आहे.

याविषयी दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित दोन तेलबिया पिकांचे यात सोयाबीनचा एमएयुएस-७३१ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे.

देशाच्या राजपत्रामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्याने या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल.

देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार.

सोयाबीन (एमएयुएस-७३१ वाण):

  • सोयाबीनचा हा वाण लवकर येणारा असून परिपक्वतेसाठी ९४ ते ९८ दिवस लागतात.
  • या वाणाची पाने निमपसरी, गोलाकार व मोठी असतात.
  • शेंगाचे प्रमाण अधिक व गुच्छामध्ये शेंगा लागतात.
  • तीन दाण्याच्या शेंगाचे अधिक प्रमाण.
  • शेंगा फुटण्यासाठी पंधरा दिवस सहनशीलता आहे.
  • कोरडवाहूसाठी अधिक उत्पादन देणारा.
  • कीड व रोगास प्रतिकरक.
  • १०० ग्रॅम दाण्याचे वजन १३ ते १५ ग्रॅम भरते.
  • उत्पादकता २८ ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी एवढी आहे.
  • तेलाचे प्रमाण २०.५ टक्के.
  • प्रथिनांचे प्रमाण ४०.५ टक्के आहे.

तीळ (टीएलटी-१० वाण):

  • तीळाचा टीएलटी १० हा वाण विद्यापीठाच्या लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आला आहे.
  • या वाणामध्ये तेलाचे उत्पादन सरस असून खरीप, रबी व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य आहे.
  • संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता शिफारस.
  • कालावधी ९० ते ९५ दिवसाची आहे.
  • उत्पादन हेक्टरी ६ ते ७ क्विंटल येते.
  • १००० बियाचे वजन ३.५ ते ४.० ग्रॅम भरते.
  • तेलाचे प्रमाण ४५ ते ४७ टक्के आहे.
  • सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, अल्टरनेरिया व भुरी रोगास प्रतिबंधक.
  • तुडतुडे, पाने गुंडाळणारी व बोंडे पोखरणारी अळी या किडीस सहनशील आहे.

बियाणे अधिनियम, पिकांचे वाण, कृषि मंत्रालय, राजपत्र नोंदणी, सोयाबीन वाण, तीळ वाण, कीड प्रतिकारक, तेलबिया पिके, बीजोत्पादन साखळी, शेतकरी, कोरडवाहू पिके, सर्कोस्पोरा रोग, scorespora, shetkari, wan, soyabean, til, तिळ

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading