कापूस पिकावरील किड व्यवस्थापन व उपाययोजना…

कापूस पिकावरील किड व्यवस्थापन व उपाययोजना…
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

कापूस पिकावरील किड व्यवस्थापन व उपाययोजना…

सध्याच्या ढगाळ आणि दमट हवामानामुळे कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले असल्यास कापूस पिका वरील रस शोषणाऱ्या किडींमध्ये मावा, तुडतुडे, फुल किडी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

नियमित सर्वेक्षण:

पिकाचे व किडीचे प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन नियमितपणे निरीक्षण करणे.

अन्न द्रव्य व्यवस्थापन:

पिकाला आवश्यक असणारी अन्न द्रव्य ही योग्य वेळी द्यावे, यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी पडेल. रासायनिक खतांचा शिफारसीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

तण व्यवस्थापन:

शेताची कोळपणी आणि खुरपणी किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची ८ ते ९ आठवडे तणांचे व्यवस्थापन करावे.

पिवळे व निळे चिकट सापळे:

एक हेक्टरसाठी पिवळे (१५) व निळे (५) चिकट सापळे (१.५- १.० फूट आकाराचे) पीक २० दिवसाचे झाल्यावर लावावे.

वित्तीय नुकसाना ची संकेत पातळी:

मावा - १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रसत झाडे किंवा १० मावा/पान
तुडतुडे - २ ते ३ पिल्ले/पान
फुलकिडे - १० फुलकिडे/पान

रासायनिक कीटकनाशक:

फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी ३ ग्रॅम 

बुप्रोफेझिन २५% एससी २० मिली 

डायनोटेफ्युरॉन २० डब्ल्युजी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिळवून फवारावे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा