E-KYC : पीएम किसान ई-केवायसी म्हणजे काय व कशी करावी EKYC ?
05-09-2023
E-KYC : पीएम किसान ई-केवायसी म्हणजे काय व कशी करावी EKYC ?
E-kyc : लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी खूप आवश्यक आहे. जर आपली ई-केवायसी झालेली नसेल तर आपण योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता, त्यामुळे ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे, तर ई-केवायसी कुठे करायची? कशी करायची? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत
pm kisan : अशी करा ई-केवायसी
- सर्वप्रथम, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- पृष्ठावरील ई-केवायसी वर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल. आधार क्रमांक टाका आणि शोधा.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
- पेजवर OTP टाकून सबमिट करा.
- आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.
पीएम किसान- संपर्क कसा साधायचा?
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक- 18001155266
- पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक- 155261
- पीएम किसान लँडलाइन नंबर- ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
- पीएम किसानची नवीन हेल्पलाइन- ०११-२४३००६०६
- पीएम किसान आणखी एक हेल्पलाइन- ०१२०-६०२५१०९
- ई-मेल आयडी- [email protected]